आकाशी झेप घे रे पाखरा


जीवनात खुप अडचणी येतात,

एक माणुस धडपडत राहतो,
अपयश्यांच्या पायर्‍या ओलांडत,
यशाचे शिखर गाठतो,
गाडी, बंगला, भौतिक सुखांनी सम्रुध्द होतो,
लोक त्याच्याकडे पाहुन म्हणतात,
नशीबवान आहे माणुस!

समाजात व्यक्ति तितक्या प्रव्रत्ती असतात. यशस्वी आणि सुखी असणारी माणसे खुप कमी असतात. अश्या वेळी जो तो आपापल्या नशीबाला दोषी ठरवतो. यशस्वी लोकांना भाग्यवान, नशीबवान अश्या उपमा दिल्या जातात. खरतर सगळेचजण
नशीबवान आणि यशस्वी होऊ शकतात, फक्त जीवनाकडे पाहण्याचा आणि विचार करण्याचा सकारात्मक द्रुष्टीकोन असावा लागतो. समर्थांनी म्हट्लेलेच आहे,

"जनी सर्वसुखी असा कोण आहे,
विचारी मना तुच शोधूनी पाहे!
मना त्वाची रे पुर्वसंचित केले,
तया सारीखे भोगणे प्राप्त झाले!"

आयुष्यात प्रत्येकाने धेय निश्चिंत करुन, धेयाच्या दिशेने वाटचाल केली तर हमखास त्याला यश मिळते. आयुष्याचा एक टप्पा पार केल्यानंतर समजते, अरे या अडचणीच तर आपले जीवन होते.

"In our life god does not give people we want,
But he gives people we need and make us best as he wants"

आज मी अश्याच एका यशस्वी उद्योजकाची ओळख करुन देणार आहे.


श्री दामाजी भानुदास आसबे , उत्पाद्क, एन डी ए प्लास्टेक, पुणे! यांचा जन्म "आसबेवाडी"(ता. मंगळवेढा) या छोट्याश्या खेडेगावात झाला. वडिल श्री भानुदास आणि आई सौ धौंडुबाई आसबे यांच्या प्रेमळ सहवासात ते लहानाचे मोठे झाले. दोन मोठे भाऊ आणि आई-वडिल असे पाच जणांचे कुठंब होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीदेखील सर्वजण समाधानी आणि आनंदी राहत होते.
वडिल धान्याचा आणि शेळ्या-मेंढ्याचा व्यापार करत होते. आईचे प्रेम आणि खंबीर साथ यामुळेच त्यांचे बालपण मोठ्या सुखात गेले. शाळेमध्ये असताना ते अतिशय हुशार होते, त्यांच्या हुशारीमुळे व हजरजबाबीपणामुळे ते सर्वांना आर्कषित करून घेत. सर्व शिक्षकांमध्ये ते लोकप्रिय होते.

बाजारच्या दिवशी शाळा संपली कि ते वडिलांसोबत ध्यान्यविक्री करत. वयाच्या १०-१२ व्या वर्षापासुनच त्यांना खर्‍या -वास्तव जगाची ओळख होत गेली. व्यापाराचे तंत्र आणि बाळकडू ते तिथुनच शिकले. दाहावीपर्यत "विद्यामंदिर हायस्कुल सलगर बुद्रुक"येथे शिक्षण घेतले. आयुष्याचा एक टप्पा पार केल्यानंतर पुढे काय करायचे याचे विचारमंथन चालु होते. त्यांची शिक्षणाची आवड पाहुन त्यांच्या वडिलांनी त्यांना सोलापुर दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळऊन दिला. घरची परिस्थिती बेताची असुनसुध्दा त्यांनी मुलाला खुप प्रोत्साहीत केले. स्वतः अशिक्षित असुनसुध्दा आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांची धडपड होती. घरचे संस्कार आणि जीद्द या धेयानी प्रेरीत झालेल्या श्री दामाजी आसबेनी १२ वीत पण घवघवीत यश संपादन केले. त्यांचे हे यश पाहुन त्यांच्या आई-वडिलांना उत्साह आला आणि त्यांचा पुढचा प्रवास चालु झाला.

१२ वी नंतर त्यांनी "STB Engineering College", तुळजापुर येथे प्रवेश घेतला. होस्टेलवर राहुन, तुटपुंज्या खर्चात दिवस काढले. भरपुर आभ्यास करून ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. आता वेध लागले होते नौकरीचे, पैसे कमविण्याचे...
१९९४ साली वडिलांकडून २००० रु. घेवुन ते पुण्याला नोकरीच्या शोधार्थ आले. पुण्यात कोणाचीही ओळख नव्हती, सगळं काही नवीन होते. लवकर नौकरी मिळत नव्हती. हातात फाईल घेवुन वणवण दिवसभर भटकावे लागत होते. मोजकेच पैसे सोबत असल्यामुळे खुप जपुन वापरावे लागत होते. जस जसे दिवस जातील तस तशी त्यांची चिन्ता वाढत होती. काही वेळेलातर फक्त वडापाव खाऊन झोपावे लागले होते, अखेर त्यांना पिरॅमिड ईंजिनिअरींग फॅब्रीकेशन मधे "विक्री अभियंता" ही नोकरी मिळाली. छोटीशी कंपनी, सळसळणार तरुण रक्त, कामाचा उत्साह आणि आव्हान या सार्‍यांचा सुन्दर मिलाप झाला. लवकरच त्या कंपनीची खुप प्रगती झाली. यथावकाश त्यांचे लग्न झाले. पत्नी नंदिनीचीही पदोपदी साथ लाभली. आदित्य आणि अर्थव या दोन मुलांमुळे त्यांचा संसार फुलला. दरम्यानच्या काळात त्यांच्या खुप लो़कांच्या ओळखी झाल्या.

त्यांचे एक तत्व होते - "तोंडात मध आणि डोक्यावर बर्फ" यामुळेच सर्व प्रकारच्या व्यक्ती हाताळताना त्यांना कधीही अडचण आली नाही. सुमधुर हास्य, बोलण्याचे कौश्यल्य आणि कामाची गुणवत्ता यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. १९९७ पासुन त्यानी स्वतःच्या व्यवसायाला सुरवात केली, सुरवातीला खुप अडचणी येत परंतु योग्य निर्णयक्षमता असल्यामुळे त्या सर्व दुर पळून जात. चांगले मित्र आणि जोडलेला जनसंपर्क यांच्या सहकार्यामुळे ते प्रत्येक कामात यशस्वी होत गेले. १९९९ पासुन "NDA Plastech" ही फर्म हळुहळू नावारुपाला येवू लागली. दिवस - रात्र मेहनत करून आज त्यांनी कंपनीचे नाव सार्‍या महाराष्ट्रात केले आहे. फायबरग्लासची विविध उत्पादने त्यांच्या कंपनीत तयार होतात. सध्या मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, औरंगाबाद, पंढरपुर (सोलापुर), नाशीक, अश्या कितीतरी शहरांमध्ये "NDA Plastech" च्या केबीन पाहायला मिळतात.

ते यशस्वी झाले ते केवळ त्यांच्या द्रुढ ईच्छाशक्तिमुळे, कामाच्या चिकाटीपणामुळे व सकारात्मक विचारपध्द्तीमुळे. आज त्यांच्यामुळे २०-२५ कुठूंबाना आधार आहे. बेरोजगारीचा प्रश्न थोडातरी सोडविण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. कंपनीतील प्रत्येक कामगारांना ते आपुलकीची वागणूक देतात त्यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याबद्द्ल आदर आहे. कामगारांच्या सर्व अडचणी ते मोठ्या तळमळीने सोडवतात. त्यांच्या कर्तुत्वामुळे त्यांना सप्लायरांची चांगली साथ मिळाली आहे. विश्वेश्वर सहकारी बँकेने वेळोवेळी अर्थसाहाय्य करुन कंपनीची प्रगती होण्यासाठी मदत केली आहे. ते फक्त स्वतःची प्रगती करुन थांबले नाहीत तर समाजातील गरजू लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. सन २००६ साली ते "लायंन्स क्लब पुणे न्युटाउन" चे अध्यक्ष होते. लायंन्स क्लबच्या माध्यमातुन त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले. आळंदी देवस्थानाला त्यानी वारकर्‍यांची सोय व्हावी म्हणून प्रसाधन ग्रुह भेट दिलेले आहेत. पंढरपुरच्या विठ्ठ्ल मंदिरात फायबरचे डोम दिलेले आहेत जेणेकरुन मंदिराच्या गाभार्‍यात भरपुर सुर्यप्रकाश यावा. अनेक गुणवंत व होतकरु विद्यार्थांना त्यांनी अर्थिक मद्त व मार्गदर्शन केले आहे. व्रुक्षारोपण, रक्तदान यासारख्या अनेक सामाजीक उपक्रमांमध्ये ते उत्साहाने सहभागी होतात. स्वतः सदैव उल्हासीत राहुन ईतरांना प्रेरणा देतात.

एक माणुस शुन्यातून विश्व निर्माण करु शकतो तर मग आपण का नाही? आज आपण रोज एक आत्महत्तेची बातमी वाचतो, कारण काही असो परिस्थिमुळे ती व्यक्ती लाचार होते स्वतःचे जीवन संपवण्यासाठी... जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर आपण आपली परिस्थिती बदलू शकतो. जरा स्वतःच्या मनामध्ये डोकाऊन पाहा, प्रत्येकामध्ये एक सुर्य आहे फक्त तो उगविण्याचा अवकाश... सार आकाश उजळलेले असेल. प्रत्येकजण यश्याचे शिखर गाठू शकेल.

"ध्येय ठेव अर्जुनासारखे, बाणावरती खोचलेले,
मनामध्ये उगवूनसुध्दा, गगनांपर्यंत पोचलेले"

केवळ नौकरीवर अवलंबून न राहता स्वतःच स्वतःसाठी संधी निर्माण करायची, मग सार आभाळ तुमचेच आहे... समाजाचे, आई-वडिलांचे आपल्यावर ऋण आहेत, ते प्रामाणिकपणे फेडण्याचा प्रयत्न करायचा. आपला आनंद आपणच शोधायचा... एक मेणबत्ती पेटवण्यासाठी जर दुसर्‍या उजळलेल्या मेणबत्तीचा वापर केला तर त्या मेणबत्तीचे काहीच जात नाही, हो ना?

______________________________________________________

अर्चना डांगे,
NDA Plastech,
Mobile no. ९९२३१०१४१७
Pune.
http://www.ndaplastech.com/

Comments