थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढे नगरी आपले स्वागत आहे. संतांचा आदेश म्हणजे केवळ मंदिरातील आणि देवघरातील विचारांची पोथी व व्यवस्थेची केरसूणी नव्हे, तर तो एक जीवनाचा पथदर्शक आहे. जगाच्या संघर्षातून समाजास शांतीकडे नेणारे ते एक पाथेय आहे. समाजाची समृध्द अवस्था निर्माण करणारी व त्याच बरोबर समाजाला आदर्श महान जीवनाचे दर्शन करवून देणारी ती एक जीवनदर्शी निर्मळ विचारप्रणाली आहे. श्री बाबामहाराज आर्वीकर (माचणूर, मंगळवेढा) (’दिव्यामृतधारा’ वरून) |